मासिक जडणघडण आणि सह्याद्री प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एम के सी एल प्रस्तुत करिअर मित्र कार्यशाळा
‘करिअर’ या शब्दाभोवती आता आपलं सारं आयुष्य केंद्रित झालं आहे. मात्र आपल्या घरांमधून, शाळा – महाविद्यालयांमधून आजही ‘करिअर’ विषयी पुरेशी आणि दिशादर्शक चर्चा होताना दिसत नाही. करिअर, अभ्यासक्रम आणि मुला-मुलींची आवड याचा ताळमेळ घातला जाईलच, असं चित्र दिसत नाही. यासाठीच शिक्षणक्षेत्रातील आघाडीचे ‘जडण-घडण’ मासिक आणि सह्याद्री प्रकाशनाच्या वतीने येत्या ३० मे २०१९ रोजी ‘करिअर मित्र’ ही कार्यशाळा पुण्यात आयोजित करत आहोत.
या कार्यशाळेतील मान्यवर वक्त्यांनां काही प्रश्न विचारायचे असतील तर ते jadanghadan@gmail.com या मेलवर २५ मे २०१९ पर्यंत पाठवावेत ही विनंती.
या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांनी येतांना स्वतः:बरोबर वही-पेन तसेच पिण्याचे पाणी आठवणीने घेऊन यावे ही विनंती.
प्रायोजक - लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप सोसायटी लि.
माध्यम प्रायोजक - झी २४ तास, झी मराठी दिशा
सहप्रायोजक - बँक ऑफ महाराष्ट्र, पु. ना. गाडगीळ आणि सन्स, बुलडाणा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि.
‘करिअर मित्र' कार्यशाळेतील सहभागी नामवंत वक्त्यांचा संक्षिप्त परिचय देत आहोत.
जगभरातील आठ देशांमधील सुमारे साठ हजार शास्त्रज्ञांच्या 'ग्लोबल रीसर्च अलायन्स' या संघटनेचे अध्यक्ष. नामवंत शास्त्रज्ञ आणि भारताच्या सी.एस.आय.आर. या संस्थेचे माजी महासंचालक, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग / इनोव्हेशन संबंधी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांवर मार्गदर्शक, अध्यक्ष व संचालक. देश-विदेशातील ४० विद्यापीठांकडून मानद डी.लिट्. ने सन्मानित. तसेच भारत सरकारतर्फे पद्मविभूषण या नागरी सन्मानाने गौरव.
एक कोटींपेक्षा अधिक लोकांना संगणकसाक्षर करणा-या महाराष्ट्र ज्ञान महामंडळचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणा-या सावंत यांनी शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान, विज्ञान आणि अन्य सामाजिक उपक्रमांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून काम केलेल्या सावंत यांचा भारताच्या पहिल्या महासंगणक - ‘परम' च्या उभारणीमध्येही डॉ. विजय भटकर यांच्यासमवेत मोठा सहयोग होता. देश-विदेशात आज एम. के. सी. एल. च्या माध्यमातून त्यांचे मूलभूत स्वरूपाच्या परिवर्तनासाठी विविधांगी कार्य सुरू आहे.
भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख म्हणून निवृत्त. १९७१ च्या भारत - पाकिस्तान युद्धात आणि कारगील युद्धात प्रत्यक्ष सहभाग. परम विशिष्ट सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल, वायुसेना मेडल, अग्नी पुरस्कार प्राप्त केलेल्या गोखले यांनी इराक, इजिप्त येथेही सेवा बजावली असून भारत सरकारचे सुरक्षा सल्लागार, केंद्रीय लोकसेवा आयोग, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, डेक्कन कॉलेज, पुणे इंटरनॅशनल सेंटर, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इत्यादी अनेक संस्थांमध्ये त्यांचे योगदान आहे. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी स्थापन केलेल्या पुण्यातील प्रख्यात अशा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ते माजी विद्यार्थी आणि विद्यमान अध्यक्ष आहेत. भारताच्या सशस्त्र सेना दलांच्या कारवाया, भारताचे सुरक्षाविषयक आणि परराष्ट्रविषयक धोरण यासंबंधी तज्ज्ञ विश्लेषक म्हणून त्यांची ख्याती आहे.
१९८६ मध्ये महाराष्ट्रातून एकमेव निवड झालेले आय.ए.एस. अधिकारी. त्यानंतर दहा वर्षांनी मुख्यमंत्र्यांचे उपसचिव असताना राजीनामा देऊन 'चाणक्य मंडल परिवार ' या संस्थेची स्थापना केली. प्रशासनामध्ये स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी जावेत यासाठी महाराष्ट्रात त्यांनी सुरु केलेल्या उपक्रमांना आता चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. उत्कृष्ट लेखक, वक्ते, अध्यापक आणि संघटक म्हणून परिचित. भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र संघटन या संस्थेचे महासंचालक म्हणूनही योगदान.
सध्या पुणे शहराच्या अतिरिक्त पोलिस आयुक्त पदाची जबाबदारी. राष्ट्रीयकृत बँकेतील क्लार्क पदापासून ते आय. पी. एस. सेवेपर्यंतची त्यांची भरारी युवक-युवतींना प्रेरणादायी अशीच आहे. गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल त्यांना युनायटेड नेशन्सचे पदक, राष्ट्रपती पोलिस पदक आणि पोलिस महासंचालकांचे पदक मिळाले आहे. सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून, कायद्याच्या चौकटीत राहून निर्भिडपणे काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र मधील शाखाधिकाऱ्याची नोकरी स्वेच्छेने सोडून महिला सबलीकरणासाठी १९९२ पासून कोल्हापूरच्या 'स्वयंसिद्धा ' ची धुरा त्यांनी सांभाळली आहे. ८५०० शहरी, ३०,००० ग्रामीण महिला आणि १५० कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्वयंसिद्धाने ४०,००० होऊन अधिक महिलांना प्रशिक्षण देऊन स्वतः:च्या पायावर उभे केले आहे.
शेती विषयातील एम. एस्सी. ही पदवी सुवर्णपदकासह मिळाल्यानंतर उच्च वेतनाची आलेली नोकरी सोडून गेली ४५ वर्षे शेती आणि दूध व्यवसायात कार्यरत. त्यापैकी ३२ वर्षे कोल्हापूर येथील गोकुळ सहकारी दूध संघाचे संचालक आणि सध्या दुस-यांदा अध्यक्ष. शेतीपूरक उद्योग म्हणून गोकुळमार्फत दूध व्यवसायाचा विस्तार केला. सहकार क्षेत्रात नावाजलेलं अभ्यासू व्यक्तिमत्त्व, आपटे यांच्या पुढाकारानं ग्रामीण भागात सुमारे ३00 हून अधिक सहकारी दूध संस्था स्थापन झाल्या. हजारो शेतकरी कुटुंबांना त्याचा लाभ मिळत आहे.
व्यवसायाने स्थापत्य अभियंता असलेल्या मिलिंद कांबळे यांनी भारतातील सुमारे पाच हजार दलित उद्योजकांना संघटित करून ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज' या संस्थेची स्थापना केली. केंद्र शासन आणि अन्य राज्य शासनाच्या सहयोगाने त्यांनी या उद्योजकांमार्फत देशभरातील युवकांना स्वावलंबी उद्योजकतेसाठी महत्त्वपूर्ण प्रेरणा दिली आहे. भारत सरकारने ‘पद्मश्री' हा नागरी सन्मान देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
गेली ३२ वर्षे पत्रकारितेमध्ये कार्यरत असणारे डॉ. देशपांडे हे 'जडण-घडण ' या शैक्षणिक मासिकाचे मुख्य संपादक आहेत. एम. ए. बी. जे.सी. आणि मराठी साहित्य व पत्रकारितेशी संबंधित विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. प्राप्त केलेल्या डॉ. देशपांडे यांना महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासह १५ पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांनाही पुरस्कार मिळाले असून पत्रकारिता, शिक्षण आणि समाजविकासाशी संबंधित अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा सहयोग असतो.
MKCL was promoted and established by the Department of Higher and Technical Education, Government of Maharashtra. It is an entrepreneurial endeavor to bridge the digital divide and the resultant knowledge and opportunity divide faced by the masses. It offers actionable knowledge and essential services to masses for socio-economic transformation. MKCL has emerged as a unique initiative focused on design, development and delivery of innovative e-Learning, e-Governance, and e-Empowerment technologies, solutions and services to an ever growing base of millions of users in public at large, Universities, Governments, and Communities. MKCL's mission agenda resonates well with the theme of the conference.
गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे
मुख्य प्रायोजक
माध्यम प्रायोजक
सहप्रायोजक